Friday, May 17, 2019

मलाच का बंधने

एकदा एका मुलीनं
तक्रार केली बापाकडे
मलाच का बंधने ?
जाऊ नको कुणीकडे

बाप बोलला बेटी
म्हणणे तुझं पटतयं
चल जरा बाहेर
आत खूप उकडंतयं

पेठेतून जाताना दिसलं दुकान लोखंडाचं
बाहेरच पडल होत, अवजड सामान लोहाचं
बाप बोलला ,बेटी! हे, ऊनपावसात इथंच असतं
तरी पण याला काही होत नसतं,
किमतीत पण याच्या ,अधिक उणं होत नसतं

जरा पुढे जाताच ,ज्वेलरी शाँप दिसलं
आत जाऊन मग ,हिर्याच मोल पुसलं
तिजोरीतून बंद पेटी ,हळूवार पुढे मांडली
त्याच्या झगमगाटात ,नजरच दिपली

सराफ बोलला किमती आहे ,फार जपावं लागतं
जरा सुद्धा चरा पडता ,मोल याचं घटतं
काळजी घेऊन खूप,जपून ठेवावं लागतं
तिजोरीच्या आत , लपवावं लागतं

फिरून घरी येताच, बाप बोलला "बेटी!
तूच तर माझी, हिर्याची पेटी
सांग तुला जपण्यात ,काय माझं चुकतं
तुझ्यामुळेच माझं, घर सारं झगमगतं"

"तुझा दादा म्हणजे लोखंड,जपावं लागत नाही
तू म्हणजे अनमोल हिरा,सांग चुकतं का काही
तुझ्यामुळेच घर प्रकाशित,आमचा तु अभिमान
तुझ्यासाठी काळीज तुटतं,तु जीव की प्राण"

" बस्स! करा बाबा "ऎकवत आता नाही
तुमच्याकडे माझी ,तक्रार मुळीच नाही
मीच मला आता ,जीवापाड जपेन
हिर्याच्या तेजानं, चौफेर चमकेन."

   
   
(मुलगा मुलगी समसमान, हे जरी असलं खरं
पण आपल्या लेकीला अधिक जपलेलेच बरं
पटवून द्या तिला बेटी! तू हिरा आहेस
आमच्या आनंदाचा तू झरा आहे
                           

   म्हणुन जपाव लागत😪😪😪😪💃🏻💃🏻💃🏻
व्हाट्स अप वरून,,

No comments:

Post a Comment