डे बाय डे च्या जलशात
-----------------------------------------------
गोविंदाचा इव्हेंट आणि गणरायाच फेस्टिव्हल
जिथे साजरा होतो,तिथेच
व्ह्यालेंटाईन आणि फ्रेन्डशिप डे
राष्ट्रीय सण समाजाला जातो,,
टिळकांचे स्मरण आणि राखी पौर्णिमा
झाली कालबाह्य
मातृ देवो ,पितृ देवो ऐवजी
मदर्स ,फादर्स डे भिनवा अंतरबाह्य ,,,
डे बाय डे च्या जलशात
एकदाची संस्कृतीही करा विलीन
कारण?
रेव्ह पार्ट्यांच्या जल्लोषात
सिंहगडचा ताठा हि झाला मलीन ,,
आदर्शाला गाड्नार्या
मंत्रालयाला जालनार्याना
छत्रपती का हवेत?
दूर समुद्रात ठेवायला?
एकदा त्यांनी जन्म घेतला
तर जयंत्या ?
कदाचित
कदाचित तीन मयनत्या हि साजर्या होतील ?
आचार विचारांना त्या दूर केव्हाच लोटलत
करून टाका त्याचं हि
विसर्जन गणराया बरोबर
अहो जिथे सावरकर प्रतिगामी
आणि खेमोनी साठी दुखवटा
पाळतात त्या,,
निलाज्र्यांच्या राजे तुमचे काय काम?
चला,
जा निघून आता कशातच उरला नाही राम,,,
आता कशातच उरला नाही राम.
-----------------------------------
आज सकाळपासून आता पर्यंत निदान ४\\५० तरी फ्रेन्डशिप डे चे एसेमेस आले
कालपरवा १ ऑगस्टला टिळक महाराजांची आम्हाला आठवण नाही काढावीशी वाटली?
कालपरवा राखी पौर्णिमेला नाही आठवण काढावीशी वाटली ?
फ्रेन्डशिप डे हि काय आपली संस्कृती आहे ? आणि चांगली असेल तर
हेच भावू बहिण नेमके फ्रेन्शीप डे लाच जसे जागे होतात ?
फ्रेन्डशिप डे लाही मैत्रीच वचनाच देताना की आणखी काही?
आणि वचनाच द्यायचं असेल तर साला आपली
परंपराच आहे की प्राण जाये पर वचन ना जाये ईतर हवेत कशाला ?
यावर मी सविस्तर रात्री लिहीनच तूर्तास ईतकेच
पण तरही राहवत नाही म्हणून सांगतो
आताशा ज्या समाजाला "सामाजिक बांधीलकीच भान उरलेलं नाही अशा
समजत राहायचं लाज वाटू लागली आहे हे मात्र नक्की ",,,,,
No comments:
Post a Comment