सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो वियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो न निश्चय कधी ढळो उजन्विघ्नबाधा टळो न चित्त भजनी चळो मतीस दुप्त मार्गे वळो स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो नजे प्रियस दोष ते प्रियस दोषही चांगले स्वतोक पितरा रुचे जरी हि कर दमी रांगले तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे जरी मळवीशी रजो मलीन काय तू अंबरे पिता जरी विटे विटोन जननी कुपित्री विटे दया मृतर सार्धधी नकुल क:जले त्या किटे प्रसादपट झाकिती परीपरा गुरुचे थीटे म्हणोनी म्हणती भले न ऋण जन्मदेचे फीटे कृतात्त कटका मल ध्वज जरा दिसो लागली पुर:सर्गता स्वये झगडता तनु भागली सहाय दुसरा नसे तुज विणे बळे आगळा लहू जरी उताविळा स्वरी तो कापितो आगळा दया मृतघना अहो हरीवळा मयुराकडे रडे शिशुतया सी घे कळवळोनी माता कडे असा अतिथी धार्मिकस्तुतपदा कदा सापडे पुन्हा जड भवारणवी उतरिता नदा सापडे कवी : मोरोपंत |
हे माझ्या कवितांच अग्निहोत्र आहे आणि ईथे काही ईतरांच्या गाजलेल्या कविता ही आहेत माझ्यातल्या रागाला उद्वेगाला,मीच करून दिलेली वाट आहे ही ज्या समाजात मी राहतो त्या समाजच मी काही देण लागतो याची जाणीव ठेवून ह्या दिलेल्या प्रतिक्रिया आहेत त्याना शब्द बद्द केलय मी काही कवी नाही, पण कुठ तरी वाचल होत तू असह्य होऊन काहीतरी लिहिलस का? मग ती कविता आहे आपलेच शब्द पुन्हा वाचून तोच क्षण पुन्हा मनात भरून येतो का? मग ती कविता आहे, कुणाला आवडो वा न आवडो कवितांच तुझे तसेच भागते का? मग ती कविता आहे.
Monday, February 18, 2013
सुसंगती सदा घडो
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment