Saturday, September 7, 2019

आजही निरो फिडलंच वाजवत आहे

आधीच मंदी त्यात पाऊस,,
मंदी कमवू देईना
पाऊस तगू देईना
370 आणि चंद्रयानाची देशभक्ती
नीट जगू देईना
कुणाला अभिमानच तर कुणाला देशभक्तीचा भरत आलंय,,
संपर्क तुटलाय पण हौसला बुलंद आहे बोलायची देखील हिम्मत राहिली नाही,,
पोकळ देशभक्तीने आजपर्यंत कुणाची झोळी भरली नाही,,
तरीही कुणाला मिठीच तर कुणाला धीराच कौतुक आहे
दूरस्थ चंद्राचं अमिष तर रामाला ही परवडत नव्हतं, आरशतील प्रतिबिंबा वरच त्याला भागवल होत
खरा चंद्र असतो भाकरीचा
मंदी मुळे तोही दूरस्थ होतो आहे
मात्र आजही आम्ही ,,,
मोडला सारा संसार तरी मोडला नाही कणा
मिठी मारून कुणी तरी आपलं म्हणा च
गीत गाण्यात मश्गुल आहोत
निरो मात्र तेव्हाही फिडल वाजवत होता
आता त्यात भर भक्तांची देखील पडली आहे
आता मात्र त्यात भक्तांची देखील,,,
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:

Post a Comment