Wednesday, April 22, 2020

लॉकडाऊनच्या काळामधली राजा आणिक राणी !

लॉकडाऊनच्या काळामधली राजा आणिक राणी !

(मूळ गीत - मंगेश पाडगावकर)

लॉकडाऊनच्या काळामधली
राजा आणिक राणी,
सहा फुटाचे अंतर ठेवूनी
चालू प्रेमकहाणी !

राजा वदला नको अता ती
हनिमुनची भाषा ,
ट्रॅव्हल एजंटने अपुल्या कधीचा
गुंडाळला गाशा!
का राणीच्या डोळा तेव्हा
दाटूनी आले पाणी !

राणी वदली बघत एकटक
किती गोंडस तू राजा,
उद्या पहाटे लवकर उठूनी
घेऊन ये तू भाज्या !
पण राजाला उशिरा कळली
गूढ तिची ती वाणी !

तिला विचारी राजा
का ही भांडी रोज घासावी?
का दिवसाची अपुल्या
सुरुवात अशी ही व्हावी !
या प्रश्नाला उत्तर नव्हते
राणी केविलवाणी !

का राणीने मिटले डोळे
राजा झाडू मारताना,
का राजाचा श्वास कोंडला
साफसफाई करताना !
घरकामा मध्ये बुडून गेली
एक अनोखी विराणी!

- अविनाश चिंचवडकर,
बंगलोर

No comments:

Post a Comment