आज जागतिक मराठी भाषा दिवस
दिनांक २७ .२.११
मराठी भाषेची थोरवी वर्णन करताना
श्री.संत ज्ञानेश्वर म्हणतात ,,,,,,,,
प्रतिज्ञा पूर्वक सहज जिंकतील अशी रसाळ अक्षरे (शब्द) मी ह्या मराठीत तयार करीन....
शब्द इतके चित्तवेधक व् मनोहरी असतील की त्या पुढे सुवासाची तिव्रताही फिक्की पडेल ......
दिनांक २७ .२.११
मराठी भाषेची थोरवी वर्णन करताना
श्री.संत ज्ञानेश्वर म्हणतात ,,,,,,,,
माझ्या मराठीचा बोलू कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिका मेळवीन ||१||
माझे हे बोल (शब्द) मराठी आहेत हे खरे ,परन्तु अमृतालाही परि अमृतातेही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिका मेळवीन ||१||
प्रतिज्ञा पूर्वक सहज जिंकतील अशी रसाळ अक्षरे (शब्द) मी ह्या मराठीत तयार करीन....
जिये कोवलिकेचिन पाडे |
दिसती नादिचे रंग थोड़े |
वेधे परीमळ बिक मोड़े |
जायाचेनी||२||
या शब्दांची कोमलता इतकी शेलकी, त्याच्या तुलनेत सप्तसुरंचाही आनंद कमीच असेल माझे हे शब्द इतके चित्तवेधक व् मनोहरी असतील की त्या पुढे सुवासाची तिव्रताही फिक्की पडेल ......
एका रसाळपणाचिया लोभ |
की श्रवानिंचे होती जीभा |
बोले इंद्रिय लगे कळम्भा |
एकमेका||३||
श्रोतेहो ऐका या शब्दांच्या रसाळपणाच्या लोभामुले त्यांचा आस्वाद घेण्यासाठी कानालाही जीभा
फुटतील. या रसाळ शब्दांचा आनंद लुटन्यासाठी शरीराचे सर्व अवयव आपापसात भांडतील........
सहजे शब्दे तरी विषो श्रवणाचा |
परि रसना म्हणे रसु हा आमुचा |
घ्रानासी भावो जाय परीमलाचा |
हा तोचि होईल ||४||
खरे पाहता ,शब्द हा ऐकण्याचा (कानाचा ) विषय आहे ,पण जीभ म्हणेल हा रस आमचा आहे ,
नाक म्हणेल हा गंध आमचा आहे
(माझा प्रत्येक शब्द असा रुपरस गंधपूर्ण असेल की त्यामुले इंद्रिये भांडू लागतील )
नवल बोलतीये रेखेचे वहाणी |
देखता डोळ्याही पुरो लागे धणी |
ते म्हणती उघडली खाणी |
रुपाची हे ||५||
माझ्या अक्षरांची रचना अशी नवलपूर्ण(नयनरम्य ) आहे की ,ती पाहून पाहानार्यांच्या डोळ्यांना सुध्हा
पूर्ण समाधान मिळेल आणि ते म्हणतील की,
ही तर प्रत्यक्ष रूप सौंदर्याची खाण च आहे .
जेथे संपुर्ण पद उभारे |
तेथे मनची धावे बहिरे |
बोलू भुजाही अविष्कारे |
आलिंगावया ||६||
जेव्हा शब्दांची जुळणी होउन अर्थबोधक अशी पदरचना तयार होईल, तेव्हा मनाला एव्हादा आनंद होईल की,
ते स्वतः इतर इंन्द्रियांना मागे सारुन बाहेर येईल. आणि त्याचे हात त्या पद रचनेला आलिंगन देण्यासाठी
कवेत घेण्यासाठी पुढे सरसावतिल.
ऐशी इन्द्रिये आपुलालिया भावी |
झोम्बती परि तो सरीसेपणेची बुझावी |
जैसा एकला जग चेववी |
सहस्त्रकरू ||७||
आशा रितीने ही निरनिराळी इन्द्रिये आपापल्या स्वभाव धर्मानुसार त्या शब्दांना झोम्बवतील
शब्दांचा आस्वाद घेतील.परन्तु ते शब्द ही सर्व ईंद्रियांची सारखेपणाने समजुत घालतील.
ज्याप्रमाणे एकटा सूर्य सर्व जगाला जागे करतो .
तैसे शब्दांचे व्यापकपण |
देखिजे असाधारण |
पाहातया भावादन्या फावती गुण |
चिंतामणीचे ||८||
त्याच प्रमाने या शब्दांचा विस्तार या शब्दांची व्याप्ति अलौकिक आहे .याचा अर्थ भावनेने जाणुन घेवु
इच्छीनार्यांत्या शब्दांमधे चिंतामणीचे गुण आढलुन येतील .
प्रत्येक मराठी प्रेमिकास हवे ते प्राप्त होईल.
Balaji Hiware जात, गोत्र आणी धर्म हा आमचा एकच कि आम्ही **माय मराठीचे** लेकरे.
ReplyDeleteabout a minute ago · Like