Thursday, February 17, 2011

समर्थांनी रामाच का निवडला?

महाराष्ट्राला परंपरा तशी वारकरी संप्रदायाची पण
सारा देश फिरल्यावर त्यांचा लक्षात आल ,,
कि सध्याचा काळ हा हात कमरेवर ठेवून उभा राहायचा नसून
शस्त्र सज्ज रामा सारखा हातात धनुष्य घेण्याचा आहे म्हणून
हातात धनुष्य घेवून सज्ज राहणाऱ्या श्री रामाची त्यांनी निवड केली .
त्यांच्यासाठी पंढरीतला विठ्ठल हेच रामाच प्रती रूप होत .
म्हणूनच त्यांनी पंढरीत जावून
विठ्ठला समोर टाहो फोडला
येथे कारे उभा श्रीरामा,,?
अरे रामा बाहेर असा अनाचार मजला आहे
यवन मजला आहे आणि तू येथे
कमरेवर हात ठेवून उभा कासा?
आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करतच आहोत आता तू हि ये
रामा ये ssss,येsss आमच्या मदतीला येsssss तू  आमच बळ हो
त्यांनी आर्त टाहो फोडला ,,,,,
-----------------------------------
येथे कारे उभा श्री रामा ?
मन मोहन मेघश्यामा,,,२
येथे कारे उभा श्री रामा
मन मोहन मेघश्यामा,,२
काय केली ,,,२
अयोध्या पुरी,,तिथे वसविली पंढरी,,,२
काय केली शरयू गंगा,,२,२,२
तिथे वाहे चंद्रभागा,,,२
येथे कारे उभा श्री रामा,,?,,,,२
अरे हे चाप बाण काय केले रे?
कर कटावरी ठेले रे,,२
रामदासी जैसा भाव ,,२
तैसा भाव पंढरीराव,,,,२
येथे कारे उभा रे श्रीरामा,,,
-----------------------------
येथे कारे उभा श्रीरामा? याच एकमेव कारण ,
विठ्ठल भक्तीच्या ज्या काही अनेक कथा होत्या
त्या मध्ये भक्ताला सतत मदतच केली
शत्रूला शासन केलाय अस कुठे निदर्शनास आल नव्हते ,
दामाजीपंतला शिक्षा झाली कि देवाने गुपचूप उठावे
सावकारास त्याचे पैसे द्यावे त्याची सोडवणूक करावी,,
कुणी अंगावर थुकतोय मार बुडी परत पाण्यात
वर तुझ्या मुळे आज मला गंगा स्नान घडले अशी बतावणी करावी
हे सार बघून समर्थ विचार करत ,,,
कि देवाला दोन सोडून चार हात असताना
देव त्याला शिक्षा करत नाही असा प्रश्न त्यांना सतत पडे,,,,,,,,
त्याधीवाल्याची दाढी धरून गचकन खेचून
त्याची गचांडी पकडून त्याला का जाब विचारात नाही कि माझ्या भक्ताला
शिक्षा करणारा तू कोण? टिकोजी राव?
हरामखोर कानफड फोडेन,,sssss
अस देव का बोलत नाही हा विचार सतत येत असे ,
३०० वर्षे हा सारा प्रकार देशभर महाराष्ट्रभर चालला होता,
यवन माजले होते महाराष्ट्राच्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवला जात होता .
अशावेळी या महाराष्ट्र भवानीला वाचणारा त्यांना त्यांना राम हवा होता .
यवनांना शासन करणारा श्रीराम हवा होता.
कारण त्यांनी ओळखले होते ,
शक्तीने मिळते राज्य शक्ती नसता भक्तांची विटंबना ,,,,,
कौरव संपवायचे असतील तर फक्त श्रीकृष्ण मागे असणे काही
कामाच नाही . आधी ती ताकद कमवा ती ईर्ष्या बाळगा
देवाच अधिष्ठान आपोआपच येत मागो माग ,,,,,
योग्य ती शक्ती योग्य त्या ठिकाणी दाखवणारा राम हवा होता.
म्हणून सामर्थ्याची उपासना करा माग बघा
तुमच्या उपासनेत सामर्थ्य आपोआप येईल .


6 comments:

  1. श्रीराम ! आवडले उत्तम !

    ReplyDelete
  2. Hi Sunil,
    Manali Gupte commented on your note "समर्थांनी रामाच का निवडला?".
    Manali wrote: "नव्हे सार संसार हा घोर आहे । मना सज्जना सत्य शोधूनी पाहे ॥ जनी वीष खाता पुढे सुख कैचे । करी रे मना ध्यान त्या राघवाचे॥"

    See the comment thread

    ReplyDelete
  3. Hi Sunil,
    Praful Dindorkar commented on your note "समर्थांनी रामाच का निवडला?".
    Praful wrote: "॥ जय जय रघुवीर समर्थ ॥"

    See the comment thread

    ReplyDelete
  4. समर्थांनी रामच का निवडला याचे कारण वेगळे आहे. समर्थ १६३३-३६ दरम्यान पंजाबात फिरत असताना शिखांचे गुरु गोविंदसिंह यांना भेटले. गोविंदसिंगांचा अवतार (घोडा, धनुष्य तलवार, चिलखत) पाहून समर्थ त्यांस म्हणाले.. हा कसला गुरु? एखाद्या योद्ध्य सारखे राजासारखे तुम्ही राहता आणि स्वतःला गुरु म्हणवून घेता? अशी कशी भक्ती तुम्ही शिकवता? गोविंद सिंग म्हणाले, महाराज, वरून मी नारळासारखा दिसतो परंतु आतून अतिशय गोड आहे. आमचे मुघलांशी सततचा संघर्ष चालू असतो त्यामुळे आम्हास सतत युद्धाच्या तयारीनिशी रहावेच लागते. आणि नाही राहिले तर आमचा समूळ नायनाट होईल.

    तेंव्हा समर्थांनी विचार केला कि आपल्या मराठी बांधवांना सुद्धा असेच दैवत हवे कि जे भक्ती आणि शक्ती यांचे प्रतिक असेल.. म्हणून समर्थांनी भक्ती म्हणून हनुमान आणि शक्ती म्हणून श्रीराम यांची निवड केली असावी.

    सदर प्रसंग शिखांच्या धर्मग्रंथामध्ये नावानिशी आणि तारखेनिशी नमूद केला आहे.

    ReplyDelete
  5. तेंव्हा समर्थांनी विचार केला कि आपल्या मराठी बांधवांना सुद्धा असेच दैवत हवे कि जे भक्ती आणि शक्ती यांचे प्रतिक असेल.. म्हणून समर्थांनी भक्ती म्हणून हनुमान आणि शक्ती म्हणून श्रीराम यांची निवड केली असावी.

    ReplyDelete
  6. Shivam Ugale जनी वीष खाता पुढे सुख कैचे ।
    करी रे मना ध्यान त्या राघवाचे॥
    12 hours ago · Like

    ReplyDelete