Monday, December 3, 2012

पाथरवट मी नव्या युगाचा,,,,

जुनाट झाला  इमला सारा
पाडुनी टाका देवूनी धक्का
आणिक बांधा नवी इमारत
पाथरवट मी नव्या युगाचा आहेच सोबत ,,,
मारा हाका जमाव लोका
लोकशक्तीचा साधुनी मोका
पाडुनी  टाका देवूनी धक्क़ा
असेंन मी जरी अद्न्य रांगडा
एक छान्निचा एक घाव तरी
बसू द्या रे माझ्या हातून
त्या दगडावरी
जुनाट झाला इमला सारा....
-------
 मराठी माणूस , मराठी भाषा ,मराठी संस्कृति ,
आणि त्यांच हिंदुत्व जपयाला शिकवणारा नेता
आपले बाळा साहेब महाराष्ट्राचा हा पाथरवट
आज मराठी माणूस फक्त  मुंबईतच नव्हे तर देशात आणि परदेशात ही
ताठ मानने वावरतो तो केवळ बाळा साहेबांमुळे
आणि म्हणूनच बाळा साहेबांचा ,भगव्या झेंड्याचा ,अभिमान बाळगण्यासाठी
शिवसैनिक असण्यची गरज नाही केवळ मराठी असण हि पुरत
बाळासाहेबांच्या निधनामुळे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची
राजकीय ताकद कमी झाली आहे
आता पुढचा काळ खूप कठीण आहे
असा पाथरवट होणे नाही
हे आता शिव धनुष्य आपणच उचलल  पाहिजे,,
कारण शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी काय केल हे आजची
तरुण पिढी कदाचित विचारू शकतील म्हणून
साहेब जरी गेले तरी त्यांचे अपुरे राहिलेले मराठी माणसासाठीचे कार्य , हिंदुत्वाचे कार्य अजूनही आपल्याला पूर्ण करावयाचे आहे.....
त्या कार्यात आपण स्वातःला

मनापासून वाहून घेतले तर आणि तरच ती खरी श्रद्धांजली ठरेल ...
ज्वलंत राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचा निखारा जरी आज विझला असला तरी त्याची धग विझली नाही ...
ती धग आता प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जाऊन अधिक तेजस्वी झाली पाहिजे  ...
--------
"कशास आई, भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते",,,
।।जय हिंद जय महाराष्ट्र ।।

1 comment:

  1. "कशास आई, िभजविस डोळे उजळ तुझे भाल राीया गभात उाचा असे उषःकाल सरणावरती आज आमुची पेटतात ेते उठितल या वालांतुन भावी ांतीचे नेते",,, ।।जय हंद जय महारा ।।

    ReplyDelete