Monday, March 11, 2013

माय अन हंबरनारी गाय

पण्यासाठी धावणारी माय अन
हंबरनारी गाय बघूनही
मिनरल वाटर साठी सहज रुपये पंधरा मोजतो
अन दुधात पाणी टाकल म्हणून कावून कावतो?
खोल खोल गेलेल्या विहिरी अन
कोरडे बोअर, पाणी प्रकल्पात उरला फक्त गाळ
विरोधाची बांधून पायी चाळ
कदाचित पडून घेतील आपल्याच गळ्यात विजयाची माळ
आता सहन होईना अन सांगता हि येईना
दुष्काळाच्या वणव्यात होरपळत जगताहि  येईना   


1 comment: