Sunday, May 12, 2019

आऊटडेटेड आई????

मला वेळेत उठवणारी,,
कपडे इस्त्री करणारी,,
केसाला वेणी फणी करणारी,,
माझा नट्टापट्टा करून व्यवस्थित डब्बा तो ही आवडणारा खाऊ भरून देणारी,,
मी आई म्हणून आजकाल मात्र
आऊटडेटेड वाटू लागली आहे,,,
नोकरी करू म्हंटल तेव्हा मुलांनी अडवलं
नातेवाईकांनी टोकल नवऱ्याने धुसफूस केली
म्हंटल हरकत नाही घरातच करू तर हे घर आहे
ऑफिस किंवा दुकान नाही म्हणत सगळ्यांनीच नकारघंटा वाजवली,,,
तू आई आहेस तू आपला वेळ जो मुलासोबत घालवला पाहिजे म्हणत मला माझ्याच कर्तव्याची जाणीव करून दिली गेली,,,
लहानपणा पासून आम्ही मुलांनी आईवर अस काही गारुड केलंय की आईला जे जे करावस वाटलं ते फक्त आमच्यासाठीच ,,,,, तिच्यासाठी तिच्याकडे वेळच नव्हता
पण तीच मुलं आजकाल मला सांगत असतात
आई तू अशी गबाळी नको ग राहत जाऊ,,,
आणि ऐक शाळेत मिटींगला बोलावलं आहे काही तरी चांगलं घाल ,, समजलं का? आई ऎकतस ना?
नसेल जमत तर ताईला पाठव मी सांगेन सरांना
आई आजारी आहे म्हणून ताई आलीय,,,,
आणि हो तिकडे मिटिंग मध्ये इंग्रजी वैगेरे बोलू नकोस,,, नाही तर अस कर ना तू काही बोलूच नकोस ना गप्प बस फक्त,,
ज्यांना अबकड abcd शिकवले बोबड्या बोलांना त्यांच्या वळण लावले
ती मी मात्र आजकाल मुलांना आऊटडेटेड वाटू लागले होते
आजकाल कपडे बदलताना देखील हळूच डोळ्यांच्या कोपरातून मुलांची नजर शोधत असते नकळत त्यांनाच विचारत असते हे बर दिसतंय ना ??
उगाचच आपल्यामूळे मुलांना कुणी नाव ठेवू नये
जस मुलांना वाटत तस दिसायला काय हरकत आहे?? त्यांच्या सारख रहायला काय हरकत आहे?
त्यांना वळण लावता लावता आज त्यांच्या सोबत वळू पाहतेय,,, कुणी नाव नको ठेवायला आपल्या मुलांना,,
पण आईच्या या बळजबरीने आणले गेलेल्या या उसन्या अवसनाकडे पाहत उद्याचा माझा चेहरा मला दिसतोय आणि सत्याची जाणीव झालेला मी आज मात्र माझ्या आईला सांगू इच्छीतो
आई मी चुकलोच तू राहा जशी आहेस तशीच
तू कशीही राहिलीस तरी माझी आईच राहशील
आई तू कधीच आऊटडेटेड नव्हतीच
तुझा हात धरत लंगडत चालता चालता मीच कधी जोरात धावू लागलो हे मलाच कळलं नाही
नाही कस ? कळतच होत पण धावायची धुंदी होती
डोळ्यावर
तुझाच,,,, आई तू कधीच आऊटडेटेड नव्हतीस
तू होतीस तू आहेस म्हणून तर माझ्यातला मी आहे
अजूनही,,,,
सुनील

No comments:

Post a Comment