Wednesday, March 28, 2012

तो,भूत आणि भविष्य

रांगता रांगता उभा राहिलो
पळून गेले दिवस चार ,
कळले नाही कधी विशी आपण केली पार,
हळूच सांगून जाती मिसरूड
चेहऱ्यावरील सार,,
नजर झाली तेज आता
शरीर झाले पिळदार
चलताना वागे जसा
बेदरकार ,,,
हसत खेळत गात होतो
तारुंण्याची गाणी
हृदयात साठवत होतो
गोड गोड आठवणी ,
हळूच एक दिवस मग,,,२
लक्षात आल केली साठी पार
सांगून गेल्या सुरकुत्या
चेहऱ्यावरील सार
आता नजर झाली कमजोर
शरीर देईना साथ
उठता बसता घ्यावा लागतो आता मात्र आधार,
रडत कुढत गात राहिलो
संसाराची गाणी
हृदयात साठवल्या साऱ्या कडू गोड आठवणी
आता ,,,,?
मुलगा झाला कलेक्टर मुलगी झाली मामलेदार
आपल्याहि साठी उघडेल आता वृद्ध्श्रामाचे दार,
पाणावलेल्या डोळ्यात दाटला
आसवांचा महापूर
हरवलेल्या संसाराची
वेड्या मना हुरहूर,,,

No comments:

Post a Comment