Thursday, March 15, 2012

फेसबुक,हत्ती आणि सात आंधळे ,,,

हत्ती आणि सात आंधळे हि गोष्ट तर साऱ्यांनाच माहित असेल
ते आंधळे जसे प्रत्येक जण आपाल्या परीने
त्या हत्तीच वर्णन करतात कि
हत्ती सुपासारखा,
हत्ती खांबा सारखा,
हत्ती सापां सारखा ,,
वैगेरे वैगेरे ,,
तर आजचे हे निष्क्रीय आंधळे(आंधळ्याच सोंग)असेच पुन्हा त्या हत्ती भोवती
जमले तर काय गाप्पा मारतील ?
असा सहज मनात विचार आला आणि,,,
कारण ईथे प्रत्येक जण मला काय त्याच हि भूमिका
घेवून वावरत असतो पण,,,
माझ्यावर शेकल तर ,,नाही ह नाही चालणार
अस म्हणत बाह्या सरसावतो,,
आणि बऱ्याच वेळा मला फेसबुक वर हे जाणवलं
च्याटिंग चे मुखवटे आज कृतीचे ओळखू येवू लागले...
म्हणूनच समस्त फेसबुकी फुशार्कीला सदर कविता अर्पण ,,,


हत्ती भोवती सात आंधळे
लंब्या चौड्या मारती बाता
हत्तीच्या पाठीवर बसता
स्वर्ग लागतो म्हणती हाता
हत्ती भोवती,,,,,
ऐसे सात शहाणे म्हणती
आम्ही भीत नाही कशाला
उन्हास आम्ही पांघरतो
आणि वादळ सतत उशाला
हत्ती भोवती,,,,,
आम्ही सख्खे भाऊ म्हणती
परंतु असतो सहाच कैसे?
जेव्हा एक करीतसे गणती
हत्ती भोवती,,,,,
सात वार ती आमची नावे
कधी चुकून विसरतोच आम्ही
प्रसंग येत ऐसा बाका
पुसती हत्तीलाचा नेहमी
हत्ती भोवती,,,,,
हत्ती सांगतो त्यांचीच नावे
आणि मारती गप्पा टप्पा
हत्ती भोवती सात आंधळे
सुचतील त्या त्या मारती थापा
हत्ती भोवती,,,,,
तात्पर्य--वास्तविक एकीकडे भारत महाशक्ती बनणार
बनवण्याच्या गप्पा माऱ्याच्या आणि दुसरीकडे
सकाळ पासून रात्री पर्यंत दिवस भर फुशारकी मारत राहायचं,,
या फेसबुकचा वापर फक्त मैत्रिणी बनवण्या पलीकडे आणि गप्पा
मारण्या पलीकडे होणार असेल तर या माध्यमातून नुकसानच होईल,,,
अर्थात म्हणून फेसबुक हे माध्यम वाईट नाही
पण आपली व्यवस्थाच अशी आहे कि ,
हातात सुरी देत पण तिचा वापर कसा करावा ते सांगत नाही
आपल्याकडे रोग निर्माण करतात आणि मग त्यावर औषध शोधतात पण
वेळ निघून गेलेली असते ,,,,,,
असो,
या नव्या जगातील लोकांना उद्याचे क्रांतिकारक बनयाचे असेल,
तर,फेसबुक हातात असलेच पाहिजे पण
टाकलेल्या प्रत्येक पोस्टला आपण लाईक केले म्हणजे,
उद्या होणाऱ्या संभाव्य क्रांतीचे पाईक झालो असे होते का?
आज ईजिप्त ,सिरीया,लिबिया,या देशातील लाखो लोक याच माध्यमातून
सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले,,,,
पण हे सार तेव्हाच सध्या होईल जेव्हा
यातील अतिशोयोक्ती आणि स्वप्नाळूपणा टाळाल.



3 comments:

  1. Marathi Manus, Sagar Kharpude and 12 others like this.

    Shripad S. Kulkarni everybody has to ask some questions to self," am i living for notifications? is my "drushti" pure? do i remember everthing that i aimed? am i ready to do some work on grass root leval?"
    Thursday at 12:20pm · Unlike · 3

    ReplyDelete
  2. Hemant Sahasrabuddhe वाह क्या बात है .....Sunil भूमकर जी ....
    Thursday at 9:23pm · Like

    ReplyDelete
  3. Shripad S. Kulkarni dada. chuk zali. ata parat maymarathi chalu.
    Thursday at 9:43pm · Like · 1

    ReplyDelete