Tuesday, December 7, 2010

"विश्वास ठेव"

देवा समोर उभा होतो
हताश मी हाथ जोडून
डोळ्यांमध्ये पाणी होत
मन गेल मोडून
"देवा!" मी म्हणलो ,,,,,,
काय करू कळत नाही
प्रश्नाचे उत्तर मिळत नाही
"विश्वास ठेव" देव म्हणाला,,,,,,,,,,,,,,
देवा, सगळेच रस्ते बंद आहेत
आशेचे सारेच दिवे मंद आहेत
"विश्वास ठेव" देव म्हणाला,,,,,,,,,
"देवा"आज अस वास्तव आहे
जिथे आशेचा किरण नाही
उद्या सार काही छान असेल
असा आजचा क्षण नाही
तर कशावर मी विश्वास ठेवावा ,,,?
जग विश्वासावर चालते याचा काय पुरावा,,,?
शांत पाने हसत देव मला म्हणाला,,,,,,,,,,,
"पक्षी उडतो आकाशात आपले
पंख पसरून
विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर
माती मध्ये बी पेरतो
रोज त्याला पाणी देतो
विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर
बाल झोपते खुशीत आईच्या कुशीत
विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर
उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटल्यावर
विश्वास असतो तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर
आज माझ्या दरी आलास
मनातल दुखः घेवून
कारण विश्वास आहे तुझा मी हक ऐकण्यावर,
असाच विश्वास जागाव मनात
परिस्थिती बदलते एका क्षणात
आजची स्थिती उद्या राहील अस कुठे लिहिले नाही
उद्याच चित्र कस असे हे तू पाहिलस नाही
जिथवर तुझी दृष्टी आहे त्याही पुढे सृष्टी आहे
तुझ्या बुद्धी पलीकडे बर्याच गोष्टी घडत असतात
आशेचे तुलेले धागे नकळत जोडत असतात
तुझ्या समोर तुझ्या नकळत असा क्षण येईल
ज्याची अशा सोडली होतीस ते स्वप्न खरे होईल
म्हणून,,,,,,,,,
सगळे रस्ते बंद होतील,,,,,,,,,?
तेव्हा फक्त विश्वास ठेव
जिथे संपते मर्यादा तुझी
तिथेच साथ देतो देव ..................
ह्या कवितेवर मी एक छानशी गोष्ट हि लिहिली आहे वाचा
माझ्या  सुंबरान ब्लागस्पाट .कॉम वर 
खाली त्याची लिंक देत आहे 
http://sumbran.blogspot.com/2010/12/blog-post_07.html 





No comments:

Post a Comment