२०जुन २०१० सकाळ मध्ये अभिजित थिटे यांनी
लिहिलेली हि कविता ,,,
शाळेपासून बापाच्या ,धाकात तो राहत असतो ,
कमी मार्क पडलेलं प्रगती पुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो,बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा ,हुंदडायला जात असतो,,,,,
शाळा संपते पाटी फुटते नव जग समोर येत
कॉलेज नावाच्या भूलभुलैयात मन हरखून जात
हाती असलेल मार्क घेवून पायर्या झीझवत फिरत असत
बाप पाहतो नवी स्वप्न आणि हे नवा मुखडा शोधत असत,,,,,
सुरु होत नव कॉलेज दिवस भुरकन उडून जातात ,
एटी केटी च्या चक्रातून वर्ष फुढे सरकत जातात
ग्रुप जमतो दोस्ती होते मारा माऱ्या होतात
माझा बाप कोण माहित आहे का ?
म्हणत धमक्या गर्जत असतात ,,,
परीक्षा संपते ,अभ्यास सरतो,डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत नोकरी टिकवत कमावतो चार दिडक्या
आरामात पसरणारे बाजीराव ,घोड्यावरती स्वार होतात
नोकरीच्या बाजारात नेमान मोहिमा काढू लागतात ,,,,,
नोकरी जमते ,छोकरी मिळते, बार उडतो जोरात
एकाचे दोन होतात सुखी संसार करू लागतात
दोघांच्या अंगणात आता नव बाळ येत
नव्या कोर्या बापाला मग जुना बाप कळू लागतो,,,
नवा कोरा बाप मग पोरा सवे खेळू लागतो
जुना बाप नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान दुसरा पाहतो गोष्ट महान ,,,,
रंगलेल्या गोष्टीत या मग शिरतो फ्ल्याश ब्याक
बापाच्या भूमिकेतून पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी दिसतो मग कळवळनारा बाप
त्याची लाल रेघ जो उरात घेवून फिरत असतो ,,,
कडकपणाच्या आवरणाखाली झुळ झुळणार पाणी असत
भल्यासाठी लेकराच्या झगडणार हाड असत
दोन घास खात पोरांना गोडधोड देतो
हट्टासाठी पोराच्या ओव्हरटाईम मारतो ,,,,
डोक्यावरती ऊन देत सावली देत असतो
दणांनत्या पावसातून कुटूंब आपल जपत असतो
घर नीट चालव म्हणून स्वतः बाहेर फिरत असतो
आईच्या मऊशार हातामागे त्याचाच राकट हात असतो ,,,,,
बाप कधी खचत नाही बाप कधी रडत नाही
बाप कधी उतत नाही बाप कधी मातत नाही
पोर सोडतात घरट अन शोधतात नवी क्षितीज
बाप मात्र धरून असतो घरट्याची काडीन काडी,,,,
पोराच्या यशात त्याच मन हसत
अपयश पचवताना ते आतून रडत असत
काही झाल कितीही झाल तरी कणा त्याचा ताठ असतो
खचलेल्या पोराला तोच उभारी देत असतो
सारी कथा समजायला फार मोठ्ह व्हाव लागत
बापच कठीण मन फार चटकन हाती लागत नसत
आकाशाहून मोठ्ह आणि सागराची खोली असते
बाप या शब्दाची महती मोठी न्यारी असते ,,,,,,
कळत नाही बापच मन बाप झाल्याशिवाय
बापमाणूस असतो तो बापाशिवाय कसा कळणार ?
म्हणून तर बापावर कुणी कविता करत नाही ,,,,
करणार कशी कविता कोण त्यात तो मावत नाही
चार ओळीत सांगावा ईतका बाप लहान नाही
सोनचाफ्याच फुल ते सुगंध कुपीत ठरत नाही
बाप नावाच्या देवाचा थांग कधी लागत नाही
आई मार्फत बोलाल तरी बोलल्याशिवाय राहवत नाही,,,
सांगतो आता शेवटच कान थोडा ईकडे करा
आभाळ पेलून धरण्यासाठी आभाळाचाच श्वास हवा
बाप नावाच्या पारिजातकाचे असच काहीस जीण असत
ते समजून घेण्यासाठी बापच असं भाग असत,,,
khup sunder sir
ReplyDelete