Friday, November 19, 2010

आयुर्वेदिक गझल

मध्यरात्री जागणे -
एक आयुर्वेदिक गझलमाफीचा साक्षीदार॥ ॐ धन्वंतरये नमः ॥
मध्यरात्री जागणे वाईट असते
अन दुपारी झोपणे वाईट असते
सारखे रागावणे वाईट असते
सारखे वैतागणे वाईट असते
दूध अन फळ मिसळणे वाईट असते
फ्रीजचे पाणी पिणे वाईट असते
चिप्सपिझ्झे चापणे वाईट असते
कोकपेप्सी ढोसणे वाईट असते
दूध घेणे टाळणे वाईट असते
अन चहाकॉफी पिणे वाईट असते
प्रौढ स्त्रीला सेवणे वाईट असते
अन स्वतःशी खेळणे वाईट असते
यौवनाने माजणे वाईट असते
वृद्धपण नाकारणे वाईट असते
सप्तधातू बिघडणे वाईट असते
दोषतिन्ही बिनसणे वाईट असते
आळसाने लोळणे वाईट असते
नित्यकर्मे टाळणे वाईट असते
देह शाश्वत समजणे वाईट असते
आत्मबुद्धी विसरणे वाईट असते
कालिदास काटे 

No comments:

Post a Comment