Sunday, November 21, 2010

नेमांन "सुया" टोचतो,,, "दंडात आणि मनात " ...

एक दिवस बघा गम्मत झाली , 
आमच्या गावात पक्की सड़क आली...
आणि आमचा तात्या
नियमित तालुक्याच्या बाजारला जावू लागला ...
तसा आधी बी त्यों जातच व्हता बाजाराला ,
त्याच पक्क्या सड़केहुन,,,आन 
एक दिवस आमच्या गावात "एसटी "आली,
आन  मग,
तात्याच्या तालुक्याला फेर्या वाढल्या ...
याच फेर्यांबरोबर गावात आमच्या
गावा बाहेरच वार आल.
वार्या बरोबर पैसा आला ...
त्याच पैशाचे पंख तात्याला लागल.
आन मग ,
त्या पंखानी त्यो, 
स्वप्नात उडू लागला,
बंगल्यात राहु लागला ,,,,मंग ,
हळूच एक दिवस ,
मग आमच्या गावात त्याच ,
सड़केवरन राजकारण ही आल ,
आणि शेती सोडून 
राजकारनात भरपूर पैसा हे आमच्या ,
तात्याला कळू लागल...
स्वप्नातल प्रत्यक्षात दिसू लागल 
जागेपणी भास होवू लागले..
त्याच घरातल ,
शेतीतल, शेताच्या बांधावरच ,
उसाकड़च ,सार सार लक्ष उडाल.
आणि ते राजकारना कड वळू लागल...
फुढ,,,,

त्याच सडकेहुन त्याच्या 
घरी गाड़ी आली टिव्ही आला ..
आणि तात्याच सार वेळा पत्रक बिघडल..
आता सुध्हा तात्या रोज ,,,,
तालुक्याला,,,,,
जातो,,,,
पण
?
?
?
?
?
डॉक्टर कड़े ...
नेमांन "सुया" टोचतो,,,  
"दंडात आणि मनात " ....
कारण,,,, 
शेती बरोबर मुलांकडे ही त्याच आता लक्ष नसत
गणित सार आयुष्याच असच फसत असत...
हो,आता मात्र टिव्ही बघत
तात्या राजकारना मात्र बोलत असतो,
आन ,
न चुकता कधी निसर्गाच्या ,,,
तर कधी सरकारच्या नावन "बोंबा"  मारत असतो...
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ही कविता तशी प्रातिनिधिक,
तात्या  बदलून त्या जागी स्वतहाला ही ठेवू शकतो
पण खरतर हि कविता लिहिताना माझ्या वाकड गावातील परिस्थिती माझ्या डोळ्या समोर आहे
आज तिथला माझा प्रत्येक नातेवाईक शेतीसोडून सार करतो
आणि हीच बोंब सगळीकडे  आहे आपण हि
शहरात राहून वेगळ काही करत नाही ईझी मनीच्या नादात आपल अस्तित्व हरवून बसलोय
आपल्याला आता मित्र पैसा नातेवाईक पैसा थोडक्यात काय आपला राजा मिडास झाला आहे.

1 comment: