अर्थात आता आहे असा त्याचा अर्थ नाही
पण काही गोष्टी मी आवर्जून लक्षात ठेवतो
किंवा लिहून ठेवतो .अशीच एक कविता माझे गुर्जी शिकवली होती.
ते माझे खूप लाड करायचे कारण त्या उल्हास नगरच्या शाळेत
थोडा गोरा गोमटा तब्येतीन चांगला असा मीच होतो .
आणि खेळात पुढे ,ग्यादरिंग मध्ये हि मीच पुढे असे गाण वैगेरे मी म्हणत असे .
ते आज सार ईतिहास जमा झाल . पण परवा माझा पसारा आवरताना,,,,,,,,.
त्यावेळी मी चवथीत होतो ,,,,,,,, पण वाचनाची आवड मात्र खूप
शाळेच्या पुस्तकात मी गोष्टीची ठेवून वाचत असे .
श्यामच्या आईच्या पुस्तकात मी त्यांनी शिकलेली कविता मी लिहून ठेवली होती .
पण हूड स्वभावाला त्यावेळी ती समजली नाही गांभीर्याने घ्याव ईतका माझ वय नव्हत
पण सरांचं माझ्यावर खूप प्रेम होत. का कुणास ठावूक कदाचित मी अभ्यासात
ढ असल्या मुळे असेल कदाचित पण नाही शिकलो ते सर,
पाटील गुर्जी तुम्ही आज कुठे आहात माहित नाही चंद्रपूर हून आला होतात म्हणे,
पण,,,,,
आज त्य कवितेचा कागद सापडला आणि तुमची ठेंगणी मूर्ती अचानक
डोळ्यासमोर उभी राहिली .
सर नाही शिकलो पण आज माझ्या लक्षात येतंय तुमच ऐकल असत तर,,,,,,?
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लुगड्याले माझी माय गाठ हासुन बांधते
बापू शिकरे म्हणते बापू शिकरे म्हणते |
वाळलेल्या भुईवाणी तिचे पाय हो फाटले
किती घामाचे सागर तिच्या अंगात आटले
वारा घालून जरासा वाट समोर चालते
बापू शिकरे म्हणते बापू शिकरे म्हणते |
तिच्या अंगातले हाड तिच्या अंगात जळले
तिचे काळीज रे देवा कुठु कुठून तुटले
जीवनाचे दुख तरी कशी हसत टाळते
बापू शिकरे म्हणते बापू शिकरे म्हणते |
रातनदिस एक कोड तिच्या मनात सलते
असा कसा देव गरीबाले देव पायात पिळते
तिचा आसवांचा थेंब माझ्या गालावर येते
बापू शिकरे म्हणते बापू शिकरे म्हणते |
झिझझीजुनी माय मसणात गेली
विसावली संध्याकाळ कधी न पाहत पायली
माझे कोळसे करून माय विकरे म्हणते
बापू शिकरे म्हणते बापू शिकरे म्हणते |
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,बापू शिकरे म्हणते बापू शिकरे म्हणते |
वाळलेल्या भुईवाणी तिचे पाय हो फाटले
किती घामाचे सागर तिच्या अंगात आटले
वारा घालून जरासा वाट समोर चालते
बापू शिकरे म्हणते बापू शिकरे म्हणते |
तिच्या अंगातले हाड तिच्या अंगात जळले
तिचे काळीज रे देवा कुठु कुठून तुटले
जीवनाचे दुख तरी कशी हसत टाळते
बापू शिकरे म्हणते बापू शिकरे म्हणते |
रातनदिस एक कोड तिच्या मनात सलते
असा कसा देव गरीबाले देव पायात पिळते
तिचा आसवांचा थेंब माझ्या गालावर येते
बापू शिकरे म्हणते बापू शिकरे म्हणते |
झिझझीजुनी माय मसणात गेली
विसावली संध्याकाळ कधी न पाहत पायली
माझे कोळसे करून माय विकरे म्हणते
बापू शिकरे म्हणते बापू शिकरे म्हणते |
यात आणखी एक मध्ये कडव होत पण पुस्तक आणि कागद
बराच जुना झाला कागद जे जस जमल जस आठवल जे समोर दिसल ते लिहल
आपण सारे हि कविता गोड मानून घ्याल हि अपेक्षा .
अप्रतिम,
ReplyDeleteडोळ्यातून पाणी काढणारी कविता आहे !
ही तुम्ही इथे सगळ्यांसाठी लिहिल्याबद्दल धन्यवाद :)
chhan
ReplyDelete