काही माणस ..आयुष्यभर
काही माणस मैत्रीत आपल्या खांद्यावर हात टाकतातनी बेसावध क्षणी आपल्याला
स्वतःचा खांदाच देवून टाकतात !
काही माणस..
वरन हापूस आंब्या सारखी दिसतात
चवीन त्याचा स्वाद घ्यावा तर,,
नेमकी बाठिला लागलेली असतात..
काही माणस..
वरन सुकलेल्या चिखला सारखी दिसतात
जमीन कड़क म्हणून पाय टाकावा तर ,,
आपल्याला आणखीच आत खेचतात ..
काही माणस ...
पिंपळाच्या पाना सारखी असतात
त्यांची जाळी झाली तरी
मनाच्या पुस्तकात जपविशी वाटतात
आयुष्यभर....
No comments:
Post a Comment