Sunday, October 24, 2010

जगण्यासाठी ...


जगण्यासाठी ...
पोट जाळाव लागत
घाम गाळावा लागतो 
नाक घसाव लागत 
गुढगे टेकावे लागतात ,,
कानाडोला करावा लागतो 
शब्द गिळावे लागतात 
मन मारव लागत 
पाठ फिरवावी लागते,,
बगल द्यावी लागते
दमान घ्याव लागत 
डोक चालवाव लागत 
कंबर कसावी लागते,,
आणि कधी कधी ,,
दोन हात करावे लगतात 
धडा शिकवावा लागतो 
शेवटी,,,
शेंडी तुटो पारंबी
लढत रहाव लागत. 
कारण पर्यायच नसतो .

No comments:

Post a Comment