Friday, April 16, 2010

"CITY CHANGES THE IDENTITY "

आणि अचानक म्हणजे नेमके ३.३.७ 
रोजी सिंहगडाच्या पायथ्याशी रेव्ह पार्टी साजरी होताना,
पोलिसांनी २००\२५० मुलाना बेधुंद अवस्थेत 
ट्रांस म्युझिक च्या तालावर झिंगताना जेरबंद केले 
त्यावेळी,,,,,
"ब्रेव्ह "लोकांचे पुणे आता ,
"रेव्ह"  पार्टीत रमते आहे ,
विदेशातील बरेच पाप पुण्य नगरीत
साचते आहे ,
स्वातंत्र्य नंतर अधोगतीच,,,,?
कुठली पायरी चुकली आहे ,,,?
सिंहगडाची मान आता ,
शरमेने पायथ्य पर्यंत झुकली आहे 
"CITY CHANGES THE IDENTITY "
,,,,,,,,,,,,,
पुणे तिथे काय उणे ?
जागरण गोंधळ बंद करून
ट्रांस म्युझिक च्या तालावर आणि ,,
चिलिमिला चिलिम भिडवित नाचणे
दम मरो दम म्हणत 
बेधुंद जगणे हेच आता 
आमचे जीवन गाणे
"CITY CHANGES THE IDENTITY "
,,,,,,,,,,
देवीच्या नावाने गोंधळ  घालणारे 
आज,,,
ट्रांस म्युझिक च्या तालावर 
झुलत होते ,आणि ,,,,,,
"who is tanaji malusara ,,,,,,,,,,,,?"
असे सिंहगडाला च विचारत होते 
"CITY CHANGES THE IDENTITY "
,,,,,,,,,,,
सिंहगडाच्या पायथ्याशी 
दम मरो दम म्हणत 
चिलिमिला चिलिम भिडवत होते 
आणि ट्रांस म्युझिक च्या तालावर 
आपल्याच संस्कृतीला गाड़त होते  
"CITY CHANGES THE IDENTITY "
,,,,,,,,,,
आणि इतिहासाचे सोनेरी पान
पुण्या शिवाय पूर्ण होत नाही
आणि आजकाल म्हणे 
चिलिमिला चिलिम भीड़वल्या शिवाय
पुण्याला झोपच येत नाही
                          "CITY CHANGES THE IDENTITY "शिवरायानी सोन्याच्या फालाने नांगरलेल्या या भूमित अनेक नर रत्न जन्माला आली 
परन्तु परप्रांतीयानि जसा मुंबई चा विचका केला तसाच विचका पुण्याचा झाला आहे केला आहे 

No comments:

Post a Comment