"त्याने पदर ओढला
म्हणून तिने पातळच सोडले ,,,खरा प्रकार ऐव्हडाच झाला
अणु करार पास होताच
सगळ्यांचे पितळ पडले ,,,,खरा प्रकार ऐव्हडाच झाला
@@@@@@@@@@@@@@@
"एक" मतान अणु करार पास होताच ,
नोटांची बंडल बाहेर आली ,
महात्म्याची,,,? ही विटमबना पाहून
येथे लोकशाही ओशाळली ,,,,
@@@@@@@@@@@@
भूके कंगाल जनता आणि
नोटांच्या राशी
अणु करारापाशी उघडी झाली
स्वातंत्र्याची पन्नाशी ,,,
@@@@@@@
"एक" हजाराची नोट
दुसर्या नोटेला म्हणाली ,
"चल ग आपण संसदेत जाऊ ,,,
अणु कराराचा सर्वात मोठा
रियलिटी शो पाहु ......
@@@@@@@@@@@
नोट म्हणाली नोटेला
मला तर बाई काहीच कळत नाही
अग,,,
"बाई"वरून तर खर भांडन आहे
"साहेब आणि बाई" याना अणु कराराची घाई ,
आणि ,,
अणु करार काय ते कुणालाच माहित नाही....
@@@@@@@@@@@
आणि म्हनुनच,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
डाव्यांना अणु करार नको आहे ,
उजव्यानना कोंग्रेस नको आहे ,
समाजवादिला मायावती नको आहे,
मायावातिला सर्वच हव आहे ,
कोंग्रेसस्ला हातच जायला नको आहे ,
आणि,,,
देशाशी कुणालाच घेण देण नको आहे.
मेरा भारत महान,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,?
No comments:
Post a Comment