९.९.०८ पुन्हा भैया मराठी वाद ऊफाळला नव्हे मुद्दाम चिघळवन्यात आला
जया नावाच्या गुड्डी बुड्ढीऩे कारण नसताना
अराजकीय व्यासपीठा वरून जाती जाती भांडन लावायचे काम केले
कारण होते सिनेमाचे प्रदर्शन ,,,
त्या दरम्यान "भाई हम तो यूपी के है हम तो हिन्दीमे ही बोलेंगे"
असे म्हणत कुस्सित पणे तिचे हसने सार्या जगाने पाहिले .
बोलबच्चन त्यावेळी लंडन दौर्यावर होता ,
आल्यावर कसलेल्या राजकरण्या प्रमाने मुळ प्रश्नाला बगल देत
त्याने मराठी माणसाची माफी मागुन प्रकरण मिटवले ,,
एक कुटुम्ब प्रमुख म्हणून मी माफी मागतो असे म्हणाला ,,,
एक कुटुम्ब प्रमुख म्हणून मी माफी मागतो असे म्हणाला ,,,
पण याच न्यायाने उद्या याच गुड्डीच्या हातून एखादा गुन्हा किव खुनच झाला तर ,,,,,,,,,?
कुटुंब प्रमुख म्हणून अमिताभ फासावर जाईल काय? आणि ह्या सर्व गदारोलात मुंबई पोलिस आयुक्त के.एल.प्रसाद
यांनी ही हिंदी हीरो प्रमाने ,"मुंबई कुणाच्या बापाची जहागिरी नाही "
असे सुनावाले आगीत तेलच ओतायाचे काम केले आणि मग,,,,?.
दयानियांचा आदेश पचनी ना पड़े
ते खातील जोड़े याची देही ,,,
बहिणाच्या ओळी देतील तया शाप
जे करतील पाप मराठी द्वेष ,,,
तुकयाचे अभंग सागरी ना बुडती
घड़े हे फ़क्त मराठीत,,,
मराठीसाठी झाले बहु कायदे
मोडिले वायदे स्वार्थापोटी,,,
झळके सर्वत्र मराठी पाटी
उठे शुळ पोती अनेकांच्या ,,,
"कुणी मागे माफी" "कुणी करे वाद "
शेवटी "प्रसाद" कडू झाला
"जया" काढू वाटे मराठी कळ
त्यानी काढावा पळ मायदेशी
करा नित्य प्राशन मराठी हे तीर्थ
तया विण व्यर्थ जीवन अवघे
No comments:
Post a Comment