मंगल देशा |पवित्र देशा |महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ||ध्रु||
राकट देशा कणखर देशा दगडांच्या ही देशा |
नाजुक देशा कोमल देशा फुलांच्या ही देशा |
अंजन कांचन करवंदिच्या काटेरी देशा |
बकुल फुलांच्या प्राजक्तिच्या दळदरी देशा ||
भाव भक्तिच्या देशा आणिक बुध्हिच्या देशा |
शाहिरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा ||
ध्येय जे तुझ्या अंतरी निशानावारी नाचते करी ||
जोड़ी इहपरलोकंसी,
व्यवहारा पर्मर्थासी वैभवासी वैराग्यासी ||
जरीपटक्यासह भगव्या झेंडयाच्या एकची देशा |
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ||
गोविंदाग्रज ......
No comments:
Post a Comment