Sunday, April 11, 2010

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
झालो खरेच धन्य ऐकतो मराठी 
धर्म जात पंथ एक मानतो मराठी
एव्हाडया जगात माय मानतो मराठी
 आमुच्या मना मनात दंगते मराठी
आमुच्या रगा रगात रंगते मराठी 
आमुच्या नसानसात  दंगते मराठी 
आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या पिला पीलात जन्मते मराठी 
आमुच्या लहानग्यात रांगते  मराठी
आमुच्या मूला मुलीत खेळते मराठी
आमुच्या  घरा घरात वाढते मराठी 
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुला फुलात हसते मराठी 
येथल्या दश दिशात दाटते मराठी 
येथल्या नगा नगात गर्जते मराठी  
येथल्या दरी दरीत हिंडते मराठी 
येथल्या वना वनात गूंजते मराठी 
येथल्या तरुलतात साजते मराठी 
येथल्या कलि कलित लजाते मराठी 
येथल्या नभातुन वर्षते मराठी
येथल्या पिकातुन डोलते मराठी
येथल्या नद्यां मधून वाहते मराठी 
येथल्या चरा चरात रहते मराठी 
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी 
आपुल्या घरात हाल सोसते मराठी        
हे असे कितिक खेळ पहाते मराठी 
शेवटी मदांध तख्त फोड़ते मराठी

No comments:

Post a Comment