जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा ...||ध्रु ||
रेवा ,वरदा ,कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी ,मातीच्या घागरी
भीमथडीच्या तटान्ना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ||१||
भीती न आम्हा तुझी मुलीही गड़गड़नार्या नभा
अस्मानिच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो ,शिव शम्भु राजा
दरी दरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ||२||
काल्या छाती वरती कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती ,खेळ जीवघेणी
दरिद्र्याच्या उन्हात झिजला , निढलाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला ...
दिल्ल्चे ही तख्त राखतो महारष्ट्र माझा ||३||
No comments:
Post a Comment