तेव्हड़च तर होत मराठी माणसा कड़े
भगव रक्त,,,,,,,,,
उरल सुरल ते ही आज तुम्ही काढून घेतलत
बरच झाल साहेब तस ते कामाच राहिल नव्हत
कोस्मोपोलिटिन मुम्बैत जगायच क़स?
ते त्याला कळल नव्हत
दिलेल रक्त मोजायच त्याला ठावुक नव्हत
आज पर्यंत सांडल ते मोजल तरी अधिकच भरल असत
देण्या घेण्याचा हिशेब आम्हाला कधी जमला नाही
म्हणून शिवसेनेशी नात कधी तोडता आल नाही
************************************************************************************************* गिरण्या गेल्या ,
टावर आले,
झेंडे मत्र ह्यांचे कायम फड़कत राहिले ..
मराठी गेले
उपरे आले
झेंडे मात्र ह्यांचे कायम फड़कत राहिले
मुंबई आली
बेळगाव गेले (सीमा प्रदेश)
झेंडे मात्र ह्यांचे कायम फड़कत राहिले
राज्य आले अन
सत्तेचे बळ गेले
झेंडे मात्र ह्यांचे कायम फड़कत राहिले
लाठ्या काठ्या आम्ही खाल्या
तुरुंगवास आम्ही भोगले
झेंडे मात्र यांचे कायम फड़कत राहिले
एका शब्दावर मुम्बैचे रस्ते बंद केले
आम्हीच हिन्दू सुरक्षित ठेवले
अन झेंडे मात्र ह्यांचे कायम फड़कत राहिले
लालबाग परळऩे
रस्ता धरला सरळ डोंबिवलीचा
वीरार, वसई,नाला सोपारा, दिवा क़ळवा,
दादर पलीकडचा
तरी ही झेंडे मात्र ह्यांचे कायम फड़कत राहिले कारण रक्तच आमच भगव होत
रक्ताच्या या यद्न्यात
शेवटी आहुति सैनिकाचीच होती
मुम्बैकराची दिवटी शेकोटिला उभी होती
मुबई साठी समिधा मराठीच्या झाल्या
देशोधडीला मात्र मराठीच लागले
अन झेंडे मात्र यांचे कायम फड़कत राहिले
No comments:
Post a Comment