Tuesday, May 4, 2010

बा कसाबा ,,,,,,,,


बा कसाबा 
बेचिराख केलस आमच्या स्वप्नाच गाव 
बर झाल, त्यात तरी कुठे उरला होत ठाव ?
आता माझा ही ठाव मिटवून टाक पेटवून टाक
बा कसाबा,,,
मारत रहा ak47 च्या गोल्या 
मारत रहा माझ्या उघडया पाठीवर बोम्ब गोले
वाजवत रहा कड़क ढोलक 
माझ्या हुंदक्यांच्या चामडयाच
आणि वण वणत ठेव मला अनवाणी 
या उकळत्या डांबरी कोंग्रेस्सी राज्यात 
वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी ,,,
बा कसाबा ,,,
आता असा काय उरला आहे 
विश्वास घताचा नमूना  (पाकिस्तान)
मला माहित आहे तुला करायची होती 
राख रांगोळी सगल्याची(करशील ही)
इस्लाम ची पुन्हा सत्ता आणायची होती (आणशील ही)
इथल्या माणसांचे तुकडे तुकडे करून 
वाटायचे होते पाकिस्तानला 
हो ते ही वाटशील खात्री आहे मला 
जरी फाशी झाली तुला ,,
बा कसाबा ,,,कारण,,,
आम्हाला लागली आहे चटक 
उडत्या कुल्ल्यांची  ,त्यावरच्या ठेक्यांची ,
रंगित सांगित 
चौकार ,षटकाराची 
आता छापा पडो वा कटा 
दारू आमच्या पोटातच जाणार 
अन्नाची दारू अन दारूचे अन्न  
अन बारामतिचा जिन्न 
ठरलय आता हरणार आम्ही 
आणि तरणार राजकारणी 
आमच्या च मुडदयां वर 
पाय ठेवून आमच्याच टालू वरच 
लोणी खाणार राजकारणी ,
तु तर निमित्त ,,,
बा कसाबा ,,,तु तर निमित्त 
करता करविता वेगलाच
आणि फासावर मात्र तु जाणार 
आता म्हणे होतोय तुला पच्छाताप
पण आता काय उपयोग आहे सांग 
बा कसाबा ,,,?
स्मशानातिल सारी माणस गेल्यावर कवटी फुटण्याचा,,,?
 

No comments:

Post a Comment