Thursday, September 1, 2016

हिंदू सुद्धा हि बांग रोज देऊ लागले साक्षीला कधी इंद्र तर कधी देवेंद्र ठेवू लागले

हिंदुत्व
२०१४ पूर्वी आणि २०१४ नन्तर
तुमचं आमचं सेम हिंदुत्व बदललं
आता???
हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे काय असत?
तुमचं आमचं ते कधीच सेम नसत?
हिंदुत्वाच्या व्याख्या पक्षागणिक बदलत जातात
हिंदूच हिंदुत्वाचा डोस पाजत राहतात
पाजणारे सारे,,
हिंदूच कि पुरोगामी??
विचार पडतो खरा
राम खरा कि रावण बरा
कृष्ण खरा कि कंस बरा
शिवराय खरे की औरंग्या बरा
गोंधळ मात्र उडवतात खरा
हिंदुत्वाच्या या तागडीत
हिंदुत्वाचच मोल होत
सांम दाम दंड भेद
आयुष्यतून गोल होत
पिंडीवरच्या विंचवाशी सांगा बर कस वागायचं??
इथे राजा रोज उत्तर देतो
पण वेताळ तरीही तुझ्या डोक्याची
शंभर शकलं होतील
असा शाप देत राहतो
हिंदू सुद्धा हि बांग रोज देऊ लागले साक्षीला कधी इंद्र तर कधी देवेंद्र ठेवू लागले
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
एक कडवट हिंदू











No comments:

Post a Comment