हे हिंन्दु शक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदना करि अंतःकरण तुज अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा । हा भग्न तट असे गडागडाचा आजी हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा गड कोट जंजिरे सारे । भंगले जाहलीं राजधान्यांची । जंगलें परदास्य-पराभविं सारीं । मंगलें या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्याझुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे ती बुध्दि भाबडया जीवां । लाहु दे ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा |
हे माझ्या कवितांच अग्निहोत्र आहे आणि ईथे काही ईतरांच्या गाजलेल्या कविता ही आहेत माझ्यातल्या रागाला उद्वेगाला,मीच करून दिलेली वाट आहे ही ज्या समाजात मी राहतो त्या समाजच मी काही देण लागतो याची जाणीव ठेवून ह्या दिलेल्या प्रतिक्रिया आहेत त्याना शब्द बद्द केलय मी काही कवी नाही, पण कुठ तरी वाचल होत तू असह्य होऊन काहीतरी लिहिलस का? मग ती कविता आहे आपलेच शब्द पुन्हा वाचून तोच क्षण पुन्हा मनात भरून येतो का? मग ती कविता आहे, कुणाला आवडो वा न आवडो कवितांच तुझे तसेच भागते का? मग ती कविता आहे.
Friday, January 6, 2012
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment