Friday, January 6, 2012

का रे स्वतः ला मराठी म्हणविता


का रे स्वतः ला मराठी म्हणविता?????????
रक्तबांधवांचे हाल उघड्या डोळांनी बघता
का रे स्वतः ला मराठी म्हणविता???????????

मराठीची अवहेलना, भगव्याची राख

का झाला तुमचा महाराष्ट्रधर्म खाक
मावळ्यांची नाही कुत्र्याला धाक
कोणास देऊ आम्ही अरण्यात हाक

कशी येईल पुण्याभूमीवर न्यायाची सत्ता

का रे स्वतः ला मराठी म्हणविता???????????

जेव्हा दिले या मातृभूमीने जीवन

तेव्हा का रक्तात नाही मिसळला पण
देव देश धर्मापायी पत्करीन मरण
का होईन शेत खाणारा कुंपण

का रे या पवित्र रक्ताचा दंभ मिरविता

का रे स्वतः ला मराठी म्हणविता??????????

कुशाग्र भूमीसाठी घडले भीषण महाभारत

आज ३२ तालुके पडले पराराज्यी खितपत
कोण राखील आज रय्यतीच्या राज्याची पत
का शूरवीरांपासून शून्य झाला भारत

जेव्हा नाही कधी तुमचा रक्त सळसळता

का रे स्वतः ला मराठी म्हणविता??????????

अजून सत्यसंकल्पाची वेळ गेलेली नाही

उठा आयुष्य तर्पण करा महाराष्ट्रापायी
मावळ्यांच्या चित्यांनी व्यापू दे ही वनराई
भले रक्ताच्या नद्यांनी परत येवो शिवशाही

नाही का जर ही प्रतिज्ञा आज घेता

का रे स्वतः ला मराठी म्हणविता??????????,,,,,,,

No comments:

Post a Comment