Thursday, July 28, 2011

महाराष्ट्राची अवस्था

षंढ सारी लेकर ग माय भूमी माफ कर ,,,,
विसर तो सारा ईतिहास जाळूनिया राख कर
वेड होते त्या शिवाला मोगलांशी तो भांडला
वेड होते तात्यांना तुझ्या सागरी जो झेपावला
यायचे ते न पुन्हा तू वाट पाहणे बस कर
षंढ सारी लेकरे मायभूमी माफ कर,,,,
टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव अस्मितेच्या फडती मुंग्या किडे
ना कुणी तू रक्षण्याला तू अपेक्षा लाख कर!!
षंढ सारी लेकरे ग मायभूमी माफ कर ,,,,
कोण मेले काय काय झाले ना येथे पडले कुणा
मी नि माझे घर सुखी बाकी काही म्हणा
भाडखावू लोक्षयी "भारतीया तूच मर "
षंढ सारी लेकरे मायभूमी माफ कर,,,,
दोष कुणा देवू भगवते तूच संग ना
धाडसी नेतृत्व नाही हा ठरला तुझा गुन्हा
चाड ना येथे कुणाला हेच आता मान्य कर
षंढ सारी लेकरे मायभूमी माफ कर,,,,
घालूनी मग ते शेपट्या करतील ते निषेध ही
वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेप हि
घोषणा अन भाषणांची मोज हि लांबी हातभर !!
षंढ सारी लेकरे मायभूमी माफ कर,,,,
हि कविता श्री विठ्ठल पाटील यांनी मला पाठवली आहे


4 comments:

  1. Hi Sunil,
    Mrunali Bhawsar commented on your note "षंढ सारी लेकर ग माय भूमी माफ कर ,,,,".
    Mrunali wrote: "raje tumhi punha janm ghya"

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    ReplyDelete
  2. षंढ सारी लेकर ग माय भूमी माफ कर ,,,,खरंच आम्हाला माफ कर..... आम्ही षंढ म्हणून जगलो,पण षंढ म्हणून मरणार नक्कीच नाही....


    Joshee Ameet

    11:15pm Jul 28
    षंढ सारी लेकर ग माय भूमी माफ कर ,,,,खरंच आम्हाला माफ कर.....
    आम्ही षंढ म्हणून जगलो,पण षंढ म्हणून मरणार नक्कीच नाही....

    ReplyDelete
  3. Chetan V Baraskar
    वाटतो शांत वरुनी ,
    निद्रिस्त जरी ज्वालामुखी |
    षंढ ना मी, थंड दिसलो ,
    तरी ना निवांत, ना मी सुखी | |

    ...मायभू नाही कलंकी,
    षंढ पुत्र निपजती |
    परंपरा सांगे जगाला,
    कृष्ण-चाणक्य नीती | |

    तोच वंश चालवितो,
    तोच पंथ आक्रमितो |
    षंढ अथवा थंड दिसलो,
    तरी ना निवांत, ना मी सुखी | |
    --------- चेतन बारस्कर

    ReplyDelete
  4. Aditya Borde farach sundarrrrrrrr aparatim

    ReplyDelete