छातीत निर्भय श्वास दे,
साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्या संकटांना
ठेचणारे पाय दे ।।
...ध्येय दे उत्तुंग मंगल
अढळ कैलासापरी ।
कारुण्य निर्मळ वाहू दे
हृदयातून गंगेपरी ।।
दीनदुबळ्या रक्षणा रे,
शस्त्र दे माझ्या करी ।
दु:शासनाच्या दानवी
रुधिरांत धरती न्हाऊ दे।।
निष्पाप जे ते रुप तुझे
उमजूं दे माझे मला ।
धर्म, जाती, पंथ याच्या
तोड आता श्रुंखला ।।
नवीन गगने, नवीन दिनकर,
नवीन चंद्राच्या कला,
या नव्या विश्वात तुझ्या
न्याय नीती नांदू दे ।।
छातीत निर्भय श्वास दे...
- कवि अज्ञात.
शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्रावरील "वेध महामानवाचा" ह्या सुंदर पुस्तकाच्या मलपृष्ठावरची कविता.
साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्या संकटांना
ठेचणारे पाय दे ।।
...ध्येय दे उत्तुंग मंगल
अढळ कैलासापरी ।
कारुण्य निर्मळ वाहू दे
हृदयातून गंगेपरी ।।
दीनदुबळ्या रक्षणा रे,
शस्त्र दे माझ्या करी ।
दु:शासनाच्या दानवी
रुधिरांत धरती न्हाऊ दे।।
निष्पाप जे ते रुप तुझे
उमजूं दे माझे मला ।
धर्म, जाती, पंथ याच्या
तोड आता श्रुंखला ।।
नवीन गगने, नवीन दिनकर,
नवीन चंद्राच्या कला,
या नव्या विश्वात तुझ्या
न्याय नीती नांदू दे ।।
छातीत निर्भय श्वास दे...
- कवि अज्ञात.
शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्रावरील "वेध महामानवाचा" ह्या सुंदर पुस्तकाच्या मलपृष्ठावरची कविता.
No comments:
Post a Comment