तरीही राष्ट्र कुल,,,,,,,,,,?
राष्ट्रकुलचा कोसळतो पूल
हि कलमाडीची भूल,
सोनियाने गाढवावर चढवली
वाघाची झूल ,,,,,
तरीही राष्ट्र कुल,,,,,,,,,?
धान्य सडते , दारू गळते
उपाशी मरते जनता ,
कोंग्रेस्सचा हा मंत्र असे,,
"अपना काम बनता,,,,,,जनता "
अशी जनतेची विझवली चूल,
कृषी मंत्र्याने चढवली
क्रिकेटरची झूल
तरीही राष्ट्र कुल,,,,?
जन्मभूमीला म्हणतो बाबरी
हिंदू जनताच मोठी चाभरी
उरी सर्वधर्मसमभावाची मारून सुरी
अहिंसावादाची आम्हास पडली भूल
तरीही राष्ट्र कुल,,,,?
आधी अफझल आता कसाब
सार्यांनी मांडला भारताशी हिसाब
१२ मार्च ,७\११ ,
२६\११ ह्या सार्या आमच्याच भूल
तरीही राष्ट्र कुल,,,,?
नसे खेद ना खंत आम्हा
उरी आमुच्या गांधी वसे
अहिंसेच्या आम्र वृक्षावर
गांधीवादाचे बांडगुळ पोसे
आपलाच शेख चिल्ली करून राष्ट्र आमुचे कुल असे
कसे ना कळे आम्हास हि आपलीच सारी भूल
कारण आमचे राष्ट्रच असे कुल,,,,
सो कुल,,,,,,,
No comments:
Post a Comment