Wednesday, October 24, 2018

तो जत्रेत आलेला गुजरात मॉडेलचा ट्रेलर

जत्रेतल्या आपल्या आवडत्या खेळण्याने खिळवून ठेवावी आपली नजर अगदी तशीच *नजरबंदी* केली त्याने,,
आपल्याला हवं असणार आपलं आवडत खेळणं दाखवलं त्याने सोबत *गुजरातचा ट्रेलर* ही
आणि भुललो की आपण,,
आणि देऊन बसलो त्या बदल्यात आपलं हिंदुत्व , हिंदुसण, मंदिर,देश आणि होता नव्हता तो पैसाही
देऊन टाकला चौकीदाराच्या हाती चोरांनी देश सोडून जाण्यासाठी,,
समजा पुन्हा ठरवलं एकदा खरेदी करायचं आपलं हिंदुत्व, सण, मंदिर देव, देशधर्म??
पण शिल्लक होतच कुठे?
थोडक्यात काय तर *गंडवले-फसवले*गेलो आहोत
*बोन्साय* केलेल्या हिंदुत्वाच्या झाडाला कितीही *मत* दिल तरी 56 इंची दिसत नाही हिरवी पालवी फुटत नाही
*गुजरात ट्रेलरच्या* नादात सारच गमावून बसलो
हिंदूंसाठी *कणखर नेतृत्व* शोधायला गेलो
आणि *देशासाठी वाराच गळ्यात मारून* बसलो
त्याबदल्यात नोटबदलीच्या नावावर केलं पुरत कंगाल रोहिणग्यांसाठी केलं मोकळं रान
कळलच नाही कशाच्या बदल्यात काय घेतलं? काय दिल? तोटाच तोटा मात्र दिसत होता
भानावर आलो जत्रेतून निघालो घरी अन सहजच खिशात हात टाकला,,,
आणि ध्यानात आलं
हिंदूंसाठी कणखर नेतृत्वच्या नादात *हिंदुत्वच-वेशीवर टांगून* आलो होतो
वेशीवरच ते हिंदुत्व वस्तू समजून विकायला ही काढलंय,,,!
तरीही मी हिम्मत करून ते विकत घ्यायला गेलो तर त्यावर
लेबल चिटकवल होत किंमत होती *भीतीची*
*पप्पू काँग्रेस आणि मुस्लिमांची*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

No comments:

Post a Comment