Monday, May 23, 2011

आठवले का हो आठवले

आठवले का हो आठवले
शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा महाराष्ट्रात घुमला आणि ,,,,
माझ्या स्मृती  चाळवल्या गेल्या हा नारा महाराष्ट्राला नवा नाही
परंतु उष्ट खावूनच जगणे हि ज्यांची लायकी त्या रामदास आठवलेंना काय काय कळणार ?
बाबासाहेबांनी सांगितलं होत कोन्ग्रेस हे एक जळत घर आहे त्याच्या वार्यालाही उभे राहू नका .
आणि आज पर्यंत दलित बांधव मेंढराप्रमाणे त्यांना नेते सांगतील जात राहिले .
आठवले काहो आठवले
हेच ते आठवले
लता अवचारे होणार आठवले आठवले
साखरपुडा आठवले
दिलेला शब्द मोडला आठवले
मंत्री महोदय नामदार आठवले
समाज कल्याण आठवले
मिरवणारे आठवले तोंड फिरवणारे आठवले
प्यान्थर आठवले
नामांतर आठवले
सम्यक क्रांती आठवले
ऐक्य परिषदा आठवले
रिपब्लिकन आठवले
सुकाणू आठवले
कोन्ग्रेस पाठींबा आठवले
सिद्धार्थ होस्टेल ते सह्याद्री गेस्ट हाउस आठवले
गेटवर अडवणारे पोलीस आठवले
शेवटची लोकल आठवले
बृर्जीपाव आठवले
झुणका भाकर आठवले
खर्डा चटणी आठवले

चोरटे आठवले भुरटे आठवले 
आम्हाला सारे सारे आठवले,,,,,,,,
हेच ते आठवले
शिर्डी मतदार संघ आठवले
कलर्स वाहिनी आठवले
सांगा हो तुम्हीच आठवले
रिपब्लिकन पक्षाचे काय?
आंबेडकरी चळवळीचे काय?
परिवर्तन आघाडीचे काय?
कॉंग्रेसच्या पिछाडीचे काय?
दादा साहेबांच्या युतीचे काय झाले?
गवईनच्या फजितीचे काय?
भांडार्यांच्या गतीचे काय?
तीर्पुड्यांच्या स्थितीचे काय?
फुटलेले आठवले
तुटलेले आठवले
गळलेले आठवले
पळलेले  आठवले
साथी आठवले वराती आठवले
तिष्ठणारे आठवले उष्टे खाणारे आठवले
सत्तेचे साथी आठवले
मिळणारे भत्ते आठवले
चालणारे गुत्ते आठवले
लढणारे चित्ते आठवले
भुंकणारे कुत्ते आठवले
हा बारा नव्हे कारभार आठवले
ना. पवार आठवले
जिल्हा परिषद नगरपालिका आठवले
फुले आंबेडकर विचारांचे काय आठवले
मंत्र्याची भूक आठवले
कशी पेटवायची चूल आठवले
भाग्व्याचे बोल आठवले
हिरव्याची चाल आठवले
तुम्ही केले निळ्याचे हाल आठवले
करून सोवळे आतून बगळे आठवले
फुटीरतेची वाटचाल आठवले
सत्तेचे भोक्ते आठवले
सत्तेचे मक्ते आठवले
हि ईतिहासाची साक्ष आठवले
तुम्ही एकटेच आठवले
आठवले काहो आठवले
आठवले काहो आठवले 


No comments:

Post a Comment