गुणी बाळ असा जागसी का रे वांया |
नीज रे नीज शिवराया
अपरात्रीचा प्रहर लोटला बाई |
तरी डोळा लागत नाही ||
हा चालतसे चाळा एकच असला |
अपरात्रीचा प्रहर लोटला बाई |
तरी डोळा लागत नाही ||
हा चालतसे चाळा एकच असला |
तिळ उसंत नाही जिवाला ||
निजयावयाचा हरला सर्व उपाय |
निजयावयाचा हरला सर्व उपाय |
जागाच तरी शिवराय ||
चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविसी तुझी सांवळी काया |
चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविसी तुझी सांवळी काया |
नीज रे नीज शिवराया ||१ ||
ही शांत निजे बारा मावळ थेट |
शिवनेरी जुन्नर पेठ ||
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली |
कोकणच्या चवदा ताली ||
ये भिववाया बागुल तो बघ बाळा |
किति बाई काळा काळा ||
इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया |
ही शांत निजे बारा मावळ थेट |
शिवनेरी जुन्नर पेठ ||
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली |
कोकणच्या चवदा ताली ||
ये भिववाया बागुल तो बघ बाळा |
किति बाई काळा काळा ||
इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया |
नीज रे नीज शिवराया || २ ||
- राम गणेश गडकरी ’गोविंदाग्रज’
- राम गणेश गडकरी ’गोविंदाग्रज’
No comments:
Post a Comment