Thursday, November 25, 2010

विसरला आहे......

घरात टिव्ही आल्यापासून माणुस बोलन...................विसरला आहे,

दारात गाड़ी आल्यापासून माणुस चालन...................विसरला आहे.

क्याल्क्युलेटर आल्यापासून माणुस पाढे...................विसरला आहे,

ऑफिसमधील एसीत बसून माणुस झाडा खालचा गारवा.....विसरलाआहे,

रस्त्यावर डाम्बर आल्यापासून माणुस मातीचा वास. ...................विसरलाआहे,

ब्यांकेतील खाती सांभाळताना पैशाची कीमत ..................विसरला आहे,

उत्तेजक चित्रांच्या बटबटीत पनामुले सौंदर्य पहायला माणुस.......विसरला आहे,

कृत्रिम सेन्ट च्या वासामुळे माणुस फुलांचा सुगंध........विसरला आहे.

फास्टफूड च्या जमान्यात माणुस त्रुप्तिचा ढेकर...................विसरला आहे,

पॉप रॉक च्या दणदणाटात माणुस संगीत समाधी ........विसरला आहे,

क्षणभंगुर मृगजळामागे धावतानामाणुस सत्कार्मतिल आनंद.....विसरला आहे,

स्वतःचीच तुम्बडी भरताना माणुस दुसर्याला..................विसरला आहे.

सतत धावताना माणुस क्षणभर थांबन ................विसरला आहे,

आज मनालाच इतके श्रम होतात की शरीराचे कष्ट्च माणुस..... विसरला आहे,

काचाकड्यांची नाती जपतना माणुस आपल्याच माणसांवर प्रेम करायला.....विसरला आहे,

जागेपणीच सुख तर जाऊ द्या......पण शांत निवांत झोपन देखिल माणुस ..........................विसरला आहे


No comments:

Post a Comment