Thursday, November 4, 2010

बापच असतो मुलीचा खरा मित्र

खरतर हि एका बापाने मुलीला लिहले पत्र आहे पण तरीही
मला अस वाटत या मुलीच्या जागी प्रत्येक मुलाने
स्वतःला ठेवून जरी हे पत्र वाचाल तरी चालेल
मला वाटत माझ्याकडून आपणा सर्वास यापेक्षा जास्त
चांगल्या दीपावलीच्या शुभेच्छा देता आल्या नसत्या.
राष्ट्र सेविका समितीचा एक अंक चाळत असताना हि कविता मिळाली
"वडिलांचे मुलीस पत्र"
आणि मी माझ्यातला बाप जागा झाला .
त्याने मला सांगितलं सुजन पालकत्व म्हणजे काय असते.
हे काव्यात्मक पत्र वाचताना आपल्याला जाणवू लागत.
आपण आपल्या मुलीला नेमक काय दिल पाहिजे आणि,
आपोआप तिच्या हक्काची आणि तिच्या बद्दल असलेल्या कर्तव्याची  .जाणीव होते .
हा जो बाप आहे तो आपल्या मुलीला सांगतो
प्रत्येक व्यक्ती ,घटना ,आपल्याला काहीना काही
शिकवतच असते .तो सांगतो व्यक्तिगत स्वातंत्र्य ,हक्क,
अधिकार,यासाठी जागे राहणे एव्हडच तुझ काम नाही .
तर तुझ्या सारख्या अन्य मुली ज्या पारंपारिक
अन्यायाच्या चौकटीत बंदिस्त आहेत त्यांना मुक्त करण हि तुझाच काम आहे.हो,

मात्र हे सार करताना हे मुक्ती स्वातंत्र्य उपभोगताना ,
कुटुंब संस्थेची नाळ तुटू देवू नकोस.
नवी पिढी घडवताना जुन्या पिढीला डावलू नकोस करण हे सार करशील ,
तर आणि तरच तुझ स्वतंत्र अस्तित्व प्रस्थपित होईल,
तुझा मान सन्मान वाढेल .
बर हे सारे उपदेशाचे डोस पाजून बाप थांबत नाही ,,,
तर प्रत्यक्ष जीवन संघर्षाला ,संकटांना सामोरे जाताना ,
वास्तवाचे भान राखून झगडण्याचे बळ तो देतोय .
उद्या जर का चुकून जर काही वाईट प्रसंग आलाच
तर असुक्षतेची भावना मनात येवून जीवन संपवायची पाळी तिच्या वर येवू नये .म्हणून माहेरच्या घराची व मनाची दारे तिच्यासाठी
सदैव उघडी असतील अशी ग्वाही हि देतो

तर अशी ही कविता सासरी गेलेल्या मुलीस लिहिलेल्या पत्राची
...............................................................
सगळ्या गोष्टी शिकवल्या आईने तुला पण,
तरीही जमेल तास शिकत राहा या दुनियेच्या शाळेत    .........
व्यवहाराच्या उभ्या आडव्या धाग्यांबरोबर गुंफत राहा
मायेची वीण......  आणि,
वाटून घेवू नकोस पाणी पाजण्याचा वृथा शीण!
मग शिकशीलच आपोआप ,
मायेन मिळवलेल एक माणूस ,
एका मौल्यवान दागीन्याहून मोलाच आहे
वेळेला धवून आलेल्या मित्राच मोल ,
पृथ्वीच्या तोलाच आहे.......
शिकावस तू दुसर्यासाठी झीजण पण,
त्यासाठी नसत विसरायचं स्वतःच फुलणं,
ध्यानात ठेव ! फुलणं हे मातीच कर्तव्य !
पण ,फुल होवून जाताना माती बनायला विसरू नकोस....
नव्या मनूच्या स्वागताला
दर उघडी ठेव.......
आणि कर आमंत्रण नव्या सूर्याला ,आता
किरणांनी सर्यांचीच घर उजळायची  आहेत......
लक्षात ठेव ,
अंधाराला घाबरण सोप्प असत अन दिवा लावण अवघड असत.....
पण कुणी तर अवघड काम कारण जरुरीहि  असत........
जगायचा प्रयत्न कर चौकटी वाचून ....
पण लक्षात ठेव ,
पक्शांनाही परतावास वाटत घरट्यात अंधाराल म्हणून,
तारुण्याची चव चाखताना राहूदेत जागी...
तुझ्या मनात सतत प्रेमळ आजीची ऊब......
सगळ्यांना उघड्या असलेल्या मंदिरासारखी ,
उघडी असावीत तुझी सुजन समंजस कावड........
निष्ठा जगण्याची जबाबदारी असते दुस्यावारही .....
हे समजून घेताना मिटू नकोस तुझ्या आत्म्याची  दार......
ठिपक्या ठीक्यानी जोडत जाव तस असाव ,
तुझ अस्तित्व ,
तहानलेल्या पाण्याला वाटाव घरादाराला तुझ महत्व !
जळू नकोस तू परिस्थिच्या कठोर मूर्ती समोर ,
मूळ उदबत्ती सारख ,
आणि उरुही नये तुझ्या ओठांवर  कडवट  चव ,
जळून गेलेल्या उदबत्तीच्या राखेसारखी
प्रेम सन्मान हे आहेतच ........
डोंगरातून मिळणारे प्रतिसाद ,
प्रतिसादासाठी घालावी लागते ,
आपल्याचं ओठातून साद
'तोडन सोप्प अन जोडणे अवघड ठावूक आहे तुला '
पण कधीही समजू नकोस पाहुनी झालीस आम्हाला
भावाईतकच  घर अजूनही तुझच आहे
पायाखालची वाळू सरकली तरी माहेर तुझा भक्कम आहे ......
झालेच काही विपरीत जर
लिहिशील पत्र ....
कारण लक्षात ठेव
बापच असतो मुलीचा खरा मित्र.
................................................................
आज कुटुंब संस्था समाज स्वास्थ्य यांना लागलेली किड
दूर होवून स्त्रियांवरील अन्याय अत्याचार ,हुंडाबळी ,
कौटुम्बिक छळ यापासून मुक्त अशा समाजाच्या निर्मितीसाठी 
प्रथम आपल्या पासूनच सुरवात झाली  पाहिजे तुम्हाला काय वाटत????
 





4 comments:

  1. सुनील,छान आहे हे पत्र ! पण यार मला मुलगी नाही...त्या मुळे या सुखाला वंचित आहे मी !!!!

    ReplyDelete
  2. sunil chhan lihile aahe yaar mala hi mulagi jhali tar me tila khup khup prem denaar

    ReplyDelete
  3. Sunil, kavita fakt mazyach sathi lihileli vattay!!
    Thankx

    ReplyDelete
  4. ase vadil saglyanana milale pahijet

    ReplyDelete