Wednesday, October 27, 2010

अश्वथामा आणि पांडव

खरतर मी माझी प्रत्येक कविता लिहिताना
ती वाचनार्याला का आणि कशा संदर्भात लिहिली आहे ते लगेच कळावं म्हणून मी
त्याचा नेहमी सन्दर्भ लिहित असतो पण आज नाही कारण आज खरोखर माझा 
अश्वथामा झाला आहे,,,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कौरव कोण? पांडव कोण? काहीच कळत नाही
पांडवांचा होता कौरव
विश्वास बसत नाही
आणि कौरवांचा कधी होईल पांडव
विश्वास ढळत नाही ,,,,,,
कौरव कोण? पांडव कोण? काहीच कळत नाही.
१०५ चा मंत्र आम्ही विसरलो
कायमच बेदिलीत जगायला शिकलो
कृष्ण हि येथे शिशुपालाची
शंभरी बघत राहतो
दुर्योधन आजही द्रौपदीची साडी फेडतो
मांडी फोडणारे हात
आज गांडीवर ठेवून जगतो
धर्म तेव्हाही आंधळाच ,,,
संजयाच ऐकल फक्त
अंमल त्यावर केला नाही
कौरव कोण? पांडव कोण ? काहीच कळत नाही .
कलियुगात हि कृष्ण
पांडवांना साथ देईल
हे आता शक्य नाही
कारण,,,
जगण्यात आमच्या खोटेपणा
आणि लढण्यात बोटचेपेपणा
ठासून भरला आहे
विश्वाच्या हा मायेत
सत्यमायेच  कुणी उरल नाही .
कौरव कोण? पांडव कोण? काहीच कळत नाही .
विदुराची नीती येथे
फितूर होते
अर्जुनाच्या हातातील धनुष्य
अजूनही गांडीवच असते
मात्र टणतकाराने त्याच्या आता
तोही थरथरत नाही
कौरव कोण?पांडव कोण? काहीच कळत नाही.
भरकटलेल्या अर्जुनाला
गीता सांगणारा कृष्ण
आता नाकर्त्यांच्या माथी गीता मारतो ,
आणि जय नावाच्या
ईतिहसाला स्वतः पराजित करतो
कृष्णाची हि आम्हाला कळत नाही
कौरव कोण?पांडव कोण? काहीच कळत नाही
अश्वथामा मात्र आजही भळाळती जखम
घेवून फिरतो आहे ,,,,,,२
पांडवांना शोधतो आहे ,,,,२ 

2 comments:

  1. Sunil.....chan lihiles ! aani he vastvatal satya aahe, kaltay..pan ..valat nahi.....asa zalay ?

    ReplyDelete
  2. सुनिलजी,
    छान लिहिले आहे. पण आज आपल्या सगळ्यांचा अर्जुन झाला आहे (व. पु. काळेंनी सांगितल्याप्रमाणे). कोण पांडव, कोण कौरव माहित आहे, पण भाई-बंदांवर गांडीव उचलायला हात, मन धजत नाही.

    ReplyDelete