Monday, October 4, 2010

चीडत का नाही इथली माणसे ?

चीडत का नाही इथली माणसे ?
कढत का नाहीत इथली माणसे ? 
थंड प्रेता सारखी वस्ति दिसे ,
उठत का नाही इथली माणसे?
कोंडलेला धुर न बाहेर येइ,
जळत का नाही इथली माणसे?
मध्यरात्री, क्षीण कंकाली फूटे ,
रडत का नाही इथली माणसे?
दानडग्यांची थाप येइ दारावरी,
धजत का नाही इथली माणसे?
दहशतीच्या सर्व येथे खुणा,
भिड़त का नाही इथली माणसे ?
कविवर्य ;-मंगेश पाडगावकर 
 
   

No comments:

Post a Comment