Wednesday, September 8, 2010

सार्या बैलांना त्याच्या आई तर्फे

अभिनेता जितेंद्र जोशी याने हि कविता सकाळ मध्ये लिहिली होती
त्याला हि दुसर्याने सांगितली होती (कवी.स.द. पाचपोळ, हिंगोली  )
त्याच्या भाषेत
तशीच मी हि लिहित आहे ज्याला काही लोक अशुध्ह भाषा म्हणतात
पण त्या भाषेची अवीट गोडी अनुभवल्या शिवाय नाही कळायची
मी अनुभव घेतला तुम्हीही घ्या ,,,,,
आजच्या सार्या बैलांना त्याच्या आई तर्फे
मातृ दिनाच्या आणि बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
***************************************

हंबरून वासराले
चाटती जवा गाय
तवा मले तिच्या मंदी
दिसती माझी माय
    आया बाया सांगत व्हत्या
    व्हतो जवा तान्हा
     दुष्काळात मायेच्या माजे
     आतला व्हता पान्हा
     पिठामंदी पाणी टाकून
     मले पाजत जाय
     तवा मले पीठ मंदी
     दिसती माजी माय
कन्या कट्या येच्याला
माय जाय रानी
पायात नसे वाहण तिच्या
फिरे अनवाणी
कट्याकुट्याला हि तिचं
मनात नसे पाय
      बाप माझा रोज लावी
      मायेच्या मागे टुमण
      बास झाल शिक्षाण आता
      घेवू दे हाती काम
      शिक्कुनश्यान कुठ मोठ्ठा
      मास्तर हुणार हाये  ,,,,?
      तवा मले मास्तर मंदी
      दिसती माजी माय
दारू पिवून मायेला मारी
जवा माजा बाप
थरथर कापे आन
लागे तिला धाप
कसायाच्या दावणीला
बांधिली जशी गाय
तवा मले गायीमंदी
दिसती माजी माय
        बोलता बोलता एकदा
        तिच्या डोळ्यामंदी आल पाणी
        सांग म्हणे राजा तुजी
        कावा दिसलं रानी
        भरल्या डोळ्यान कावा पाहिलं
        दुधावरची साय
        तवा मले सायीमंदी
        दिसती माजी माय
म्हणून म्हणतो आनंदान
भरावी तुजी वटी
पुना एकडाव जलम घ्यावा
माय तुज्या पोटी
तुज्या चरणी ठेवून माथा
धराव तुज पाय
तवा मले पायामंदी
दिसती माजी माय

1 comment:

  1. तुज्या चरणी ठेवून माथा
    धराव तुज पाय
    तवा मले पायामंदी
    दिसती माजी माय

    ReplyDelete